YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 6:13-30

निर्गम 6:13-30 MRCV

आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली. त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कूळ. शिमओनाचे पुत्र हे: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल. हे शिमओनाचे कूळ होते. लेवीच्या पुत्रांची ही क्रमानुसार नावे: गेर्षोन, कोहाथ व मरारी. (लेवी एकशे सदतीस वर्षे जगला.) गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही: लिब्नी व शिमी. कोहाथाच्या पुत्रांची नावे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.) मरारीच्या पुत्रांची नावे: महली व मूशी. आपआपल्या वंशावळ्याप्रमाणे ही लेवीची कुळे. अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले. (अम्राम हा एकशे सदतीस वर्षे जगला.) इसहाराच्या पुत्रांची नावे: कोरह, नेफेग व जिक्री. उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: मिशाएल, एलसाफान व सिथ्री. अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले. कोरहाच्या पुत्रांची नावे: अस्सीर, एलकानाह व अबीयासाफ. ही कोरही कुळे होती. अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला. हे आपआपल्या कुळाप्रमाणे लेवी वंशातील प्रमुख होते. ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.” हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले. जेव्हा मोशे इजिप्तमध्ये होता तेव्हा याहवेह त्याच्याशी बोलले, याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.” परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?”

निर्गम 6 वाचा