YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस 4:21-26

इफिसकरांस 4:21-26 MRCV

जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्‍यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका.