आमोस 1:1-2
आमोस 1:1-2 MRCV
तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे. त्याने म्हटले: “याहवेह सीयोनातून गर्जना करतात आणि यरुशलेमातून गडगडाट करतात; मेंढपाळांची कुरणे सुकून जातात, आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”

