तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे. याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
2 करिंथकरांस 8 वाचा
ऐका 2 करिंथकरांस 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथकरांस 8:7-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ