आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे. या गृहामध्ये असताना स्वर्गीय गृहाचे पांघरूण घालण्याची इच्छा धरून आपण एवढे कण्हत आहोत. कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही. या तंबूमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही कण्हतो व थकलेले आहोत, वस्त्रे परिधान करू नये असे आम्हास वाटत नाही, परंतु स्वर्गीय निवासस्थान धारण करावे, यासाठी की जे मर्त्य ते जीवनाने गिळंकृत करावे. ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे. यास्तव आता खात्रीपूर्वक आपण जाणून घ्यावे की जोपर्यंत आपण शारीरिक घरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर असतो. आम्ही विश्वासाने जगतो, प्रत्यक्ष पाहण्याने नव्हे. आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा.
2 करिंथकरांस 5 वाचा
ऐका 2 करिंथकरांस 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथकरांस 5:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ