रोमकरांना 1:18-22
रोमकरांना 1:18-22 MACLBSI
जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे. परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, कारण देवाविषयी मिळविता येण्यासारखे ज्ञान त्यांना स्पष्ट दिसून येते; देवाने स्वतः ते त्यांना दाखवून दिले आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये! देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.

