शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अगोदर लिहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मी कंटाळा करीत नाही, परंतु हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. ह्या कुत्र्यांपासून सावध रहा, दुष्कर्म्यांपासून सावध रहा, केवळ शरीराला बाधा पोहचवणाऱ्यांपासून सावध रहा. आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत. अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार.
फिलिप्पैकरांना 3 वाचा
ऐका फिलिप्पैकरांना 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांना 3:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ