YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांना 1:27-30

फिलिप्पैकरांना 1:27-30 MACLBSI

सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात. विरोधकांना घाबरू नका; नेहमी धैर्य बाळगा. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते परमेश्वराने केले आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे. कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात.