YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 2:14-17

मार्क 2:14-17 MACLBSI

तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकात नाक्यावर बसलेला दिसला. त्याला येशूने म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला. नंतर येशू त्याच्या घरी जेवायला बसला असता, तेथे पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूच्या मागे आले आणि तेदेखील येशू व त्याच्या शिष्यांबरोबर पंक्‍तीस बसले. त्याला जकातदार व पापी लोकांबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील काही शास्त्र्यांनी त्याच्या शिष्यांना विचारले, “हा अशा लोकांबरोबर का जेवतो?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”

मार्क 2:14-17 साठी चलचित्र