मत्तय 5:43-47
मत्तय 5:43-47 MACLBSI
‘तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर व तुझ्या शत्रूचा द्वेष कर’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याची मुले व्हावेत; कारण तो दुर्जनांवर व सज्जनांवर सूर्य उदयास आणतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना? तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना?





