हेरोदने पूर्वेकडील ज्ञानी लोकांना गुप्तपणे बोलावून, तारा दिसू लागल्याची निश्चित वेळ त्यांच्याकडून काळजीपूर्वक विचारून घेतली. नंतर त्याने त्यांना बेथलेहेमला पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बाळाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याची उपासना करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि जो तारा त्यांनी पूर्वेकडे पाहिला होता, तो बाळ होते, त्या जागेवर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे मार्गक्रमण करत राहिला. तो तारा त्यांना दिसला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या घरात गेल्यावर ते बाळ त्याची आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पाया पडून त्याची आराधना केली. त्यांच्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ह्या भेटवस्तू त्यांनी त्याला अर्पण केल्या. मात्र ‘हेरोदकडे परत जाऊ नका’, अशी सूचना त्यांना स्वप्नात मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या देशास निघून गेले.
मत्तय 2 वाचा
ऐका मत्तय 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 2:7-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ