YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 15:29-37

मत्तय 15:29-37 MACLBSI

येशू तेथून निघून गालील सरोवराजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे आल्या, त्यांच्याबरोबर लुळेपांगळे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे पुष्कळ आजारी लोक होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि येशूने त्यांना बरे केले. मुके बोलतात, लुळेपांगळे धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे बघून लोकसमुदायाने आश्‍चर्य व्यक्त केले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला. नंतर येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेवर मूर्च्छित होतील.” शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी येथे अरण्यात आम्ही कुठून आणणार?” येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.” त्याने लोकसमुदायाला जमिनीवर बसायला सांगितले. त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने परमेश्वराचे आभार मानले व त्यांचे तुकडे करून ते शिष्यांना दिले आणि शिष्यांनी ते लोकसमुदायाला वाटले. ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या शिष्यांनी भरून घेतल्या.