एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात होता, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली, म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले. हे पाहून परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे मना केलेले आहे ते आपले शिष्य करत आहेत.” त्याने त्यांना म्हटले, “दावीदला व त्याच्याबरोबरच्या माणसांना जेव्हा भूक लागली, तेव्हा त्यांनी काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर फक्त याजकांनी खाव्यात अशा समर्पित भाकरी त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात साबाथ दिवशी साबाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असे काहीतरी येथे आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता, तर तुम्ही निर्दोष लोकांना दोष लावला नसता; कारण मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.” नंतर येशू तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. तेथे पक्षाघात झालेला एक मनुष्य होता. काही लोकांनी येशूला दोष लावता यावा म्हणून विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, ज्याचे एकच मेंढरू असेल आणि साबाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती जास्त आहे! म्हणून साबाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.”
मत्तय 12 वाचा
ऐका मत्तय 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 12:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ