लूक 5:4-7
लूक 5:4-7 MACLBSI
आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली. दुसऱ्या मचव्यात असलेल्या साथीदारांनी येऊन आपणांस साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. ते आल्यावर दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की, ते बुडू लागले.


