YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 13:18-26

योहान 13:18-26 MACLBSI

मी तुम्हां सर्वांविषयी बोलत नाही; जे मी निवडले, ते मला माहीत आहेत. तरी पण ‘जो माझी भाकर खातो, तोच माझ्यावर उलटतो’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. जेव्हा हे घडेल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे म्हणून हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी ज्याला पाठवतो, त्याचा जो स्वीकार करतो तो माझाही स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो.” असे बोलल्यावर येशू आत्म्यात विव्हळला व उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.” तो कोणाविषयी बोलत असावा, ह्या संभ्रमात शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. तो कोणाविषयी बोलतो, हे विचार, असे पेत्राने त्या शिष्याला खुणावून सांगितले. तेव्हा तो येशूच्या उराशी टेकलेला होता तसाच येशूला म्हणाला, “प्रभो, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.” त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याला दिला.

योहान 13:18-26 साठी चलचित्र