माझ्या बंधूंनो, मी विश्वास ठेवतो, असे कोणी म्हणत असून तो कृती करीत नाही, तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याचे तारण करायला समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, ‘सुखी राहा, कपड्यालत्याकडे व खाण्यापिण्याकडे लक्ष द्या’, पण जीवनावश्यक गोष्टी त्यांना तुम्ही देत नाही, तर त्याचा काय फायदा? म्हणजेच विश्वासाला अनुसरून जर कृती केली नाही, तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, एका माणसाकडे विश्वास आहे आणि दुसरा मनुष्य कृती करतो. माझे उत्तर असे आहे, कोणताही मनुष्य कृतीविना विश्वास कसा ठेवू शकतो, हे मला दाखवा. मी माझा विश्वास माझ्या कृतीद्वारे तुम्हांला दाखवीन. देव एकच आहे, असा विश्वास तू धरतोस ना? छान! भुतेही विश्वास धरतात व थरथर कापतात.
याकोब 2 वाचा
ऐका याकोब 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 2:14-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ