YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 1:9-15

याकोब 1:9-15 MACLBSI

प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा आणि प्रभूने आपल्याला दीन अवस्थेकडे आणले ह्याचा आनंद धनवानाने मानावा कारण धनवान गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य प्रखर तेजाने उगवला व त्याने गवत कोमेजविले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगात मस्त असताना कोमेजून जाईल. जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात पाडले’, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाइटाचा मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते.