YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:13-19

इब्री 11:13-19 MACLBSI

हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले. असे म्हणणारे स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, तर त्यांना परत जाण्याची संधी होती; पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगत होते; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. अब्राहामने आपली कसोटी पाहिली जात असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले; अब्राहामला वचन देण्यात आले होते तरीही तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला तयार होता; परमेश्वराने त्याला असे सांगितले होते, ‘इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील’; तेव्हा मेलेल्यांतून उठवावयासदेखील देव समर्थ आहे, हे अब्राहामने मानले आणि लाक्षणिक अर्थाने त्या स्थितीतून तो त्याला परत मिळाला.