गलतीकरांना 4:3-7
गलतीकरांना 4:3-7 MACLBSI
त्याचप्रमाणे आपणही अल्पवयीन होतो, तेव्हा आपणदेखील ह्या विश्वातील सत्ताधिकारी आत्म्यांच्या गुलामगिरीत होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात, हे दर्शविण्यासाठी देवाने ‘पित्या, माझ्या पित्या’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. ह्यावरून तू आत्तापासून गुलाम नाहीस, तर पुत्र आहेस आणि म्हणूनच देवाने आपल्या लेकरांकरिता जे राखून ठेवले आहे, ते सर्व तो तुला देईल.

