YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना 1:15-24

गलतीकरांना 1:15-24 MACLBSI

परंतु देवाने जन्मापूर्वीपासून माझी निवड केली व आपल्या कृपेने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. मी यहुदीतर लोकांमध्ये त्याच्या पुत्राच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी म्हणून जेव्हा त्याने मला त्याचा पुत्र प्रकट करून दाखवला, तेव्हा माणसांचा सल्‍ला न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिष्काला पुन्हा परत आलो. तीन वर्षांनंतर मी यरुशलेम येथे पेत्राला भेटायला गेलो व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. प्रभूचा बंधू याकोब याच्याशिवाय प्रेषितांपैकी इतर कोणाची माझी भेट झाली नाही. तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे, ते खोटे लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. नंतर सूरिया व किलिकिया ह्या ठिकाणी मी गेलो. त्या वेळी ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील ख्रिस्तमंडळ्या मला व्यक्तिशः ओळखत नव्हत्या. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, पूर्वी हा मनुष्य आपला छळ करायचा आणि ज्या विश्वासाचा व प्रभूमार्गाचा तो विध्वंस करू पाहत होता, त्याच विश्वासाची व प्रभूमार्गाची तो आता घोषणा करू लागला आहे आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचा गौरव केला.