YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 5:1-11

प्रेषितांचे कार्य 5:1-11 MACLBSI

हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली. परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला. पेत्र त्याला म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून तू तुझे मन सैतानाच्या ताब्यात का दिलेस? विकण्यापूर्वी ती जमीन तुझी स्वतःची होती व विकल्यावर सर्व रक्‍कम तुझीच नव्हती काय? तर मग असे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच तो खाली पडला व मरण पावला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी आत आली तेव्हा जे घडले ते तिला ठाऊ क नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यात तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या पतीला पुरले ते एवढ्यातच परत येत आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. ह्यावरून सबंध ख्रिस्तमंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले.

प्रेषितांचे कार्य 5:1-11 साठी चलचित्र