प्रेषितांचे कार्य 1:4-15
प्रेषितांचे कार्य 1:4-15 MACLBSI
ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आदेश दिला, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने दिलेल्या ज्या वचनाविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, त्याची वाट पाहा. योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.” प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?” तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही. परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.” असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता, ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष अचानक त्यांच्याजवळ उभे राहिलेले पाहिले आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.” यरुशलेमपासून सुमारे एक किलोमिटर दूर असलेल्या ऑलिव्ह डोंगरावरून प्रेषित यरुशलेममध्ये परत आले आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले. हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र जमत असत. काही दिवसांनंतर पेत्र सुमारे एकशे वीस श्रद्धावंतांच्या समुदायात उभा राहून म्हणाला

