YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 पेत्र 3:3-9

2 पेत्र 3:3-9 MACLBSI

सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील, “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निधन पावले, तरी सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे!” ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश व पृथ्वी ही निर्माण झाली. पृथ्वी पाण्यातून व पाण्याच्या योगे घडविली गेली. तेव्हाच्या जगाचा पुराच्या पाण्याने नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच देवाच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहेत. परंतु प्रियजनहो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका! प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे.