1 पेत्र 3:15-18
1 पेत्र 3:15-18 MACLBSI
ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना आणि तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व सौजन्यपूर्वक द्या. तुमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ असू द्या म्हणजे तुमच्याविरुद्ध बोलणे चाललेले असता ख्रिस्तावरील तुमच्या एकनिष्ठेमुळे तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना लज्जित व्हावे लागेल. चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.





