रोम. 12:14-18
रोम. 12:14-18 IRVMAR
जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा. एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.

