स्तोत्र. 4:2-4
स्तोत्र. 4:2-4 IRVMAR
अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.

