YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 110

110
देव राजाला राज्य देतो
मत्त. 22:44; प्रेषि. 2:34-35
दाविदाचे स्तोत्र
1माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना
तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
2परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील;
तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
3तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात,
पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
4परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही,
“तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे
तू सर्वकाळ याजक आहेस.”
5प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे.
तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
6तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील;
तो प्रेतांनी दऱ्या भरील;
तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
7तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल,
आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 110: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन