पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो सरोवरातील एका तारवात जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवरकिनारी जमिनीवर होते. तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि तो त्यांना म्हणाला; “ऐका, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला; आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले. पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्यास काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते.
मार्क 4 वाचा
ऐका मार्क 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 4:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ