YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 10:5-14

मत्त. 10:5-14 IRVMAR

येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे. ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा. जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका.