ईयो. 31
31
ईयोब स्वतःच्या प्रमाणिकपणाचे समर्थन करतो
1“मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे,
मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू?
2वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे,
कोणता वारसा सर्वशक्तिमान उच्च देवाकडून प्राप्त होणार?
3मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे,
आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे.
4देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का?
आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का?
5जर मी असत्याने चाललो असेल,
जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल,
6मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या
म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल.
7मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन,
जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल,
जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल.
8तर मी पेरलेले दुसरा खावो,
खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जावो.
9जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले असेल,
जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल.
10तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो,
आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो.
11कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल;
खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे.
12लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
13माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल,
तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
14तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु?
देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
15ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का?
त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का?
16मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल.
किंवा मी जर विधवांना रडवण्यास त्यांचे डोळे शिणवले असेल.
17आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल,
आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल,
18(त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत)
आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे.
19जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले
किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
20त्यांनी मला अंत:करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही
कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही.
21माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून
जर मी पोरक्यावर हात उगारत असेल
22मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो
आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
23परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते,
म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही.
24जर मी सोन्याला माझी आशा केले,
‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
25मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
26जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून,
27माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर
28ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे.
कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
29माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही.
किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
30(खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.)
31मी अपरिचितांना अन्न देतो,
असा कोण आहे ज्याने ईयोबाचे अन्न खाल्ले नाही?
32परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये
म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
33इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात
परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
34कारण मला लोकांची भीती आहे,
मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते.
म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही.
35अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते.
पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे.
त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
36खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन.
मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
37त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन.
एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन.
38मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही.
माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही.
39जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता
ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्युला कारणीभूत झालो असेल,
40तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे
ईयोबचे शब्द इथे संपले.”
सध्या निवडलेले:
ईयो. 31: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.