त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही. बळजबरी करून आणि निवाडा करून त्यास दोषी ठरवून, पण त्यास जिवंतांच्या भूमीतून काढून नेले; कारण माझ्या लोकांच्या अपराधांमुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला. त्या पिढीपासून कोणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय? त्याची कबर दुष्टांबरोबर करण्याचा त्यांचा बेत होता, त्याच्या मृत्यूनंतर त्यास श्रीमंताबरोबर पुरले. तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते. तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापार्पण करता, तो त्याची संतती पाहील, तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल. तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर, तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील; तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल.
यश. 53 वाचा
ऐका यश. 53
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यश. 53:7-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ