YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्प. 26:12-18

उत्प. 26:12-18 IRVMAR

इसहाकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्यास शंभरपट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला. इसहाक धनवान झाला, तो अधिकाधिक वाढत गेला आणि खूप महान होईपर्यंत वाढत गेला. त्याच्याकडे पुष्कळ मेंढरे व गुरेढोरे, मोठा कुटुंबकबिला होता. त्यावरून पलिष्टी त्याचा हेवा करू लागले; म्हणून त्याच्या वडिलाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या. तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.” म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या खोऱ्यात त्याने तळ दिला आणि तेथेच राहिला. अब्राहामाने आपल्या दिवसात ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या त्या पुन्हा एकदा इसहाकाने खणून घेतल्या, आणि त्याच्या वडिलाने दिलेली नावेच पुन्हा त्याने दिली.