YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 6:13-30

निर्ग. 6:13-30 IRVMAR

परमेश्वराने मोशे व अहरोन यांना इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्राएल लोकांकडे आणि तसेच मिसरी राजा फारो याच्याकडे पाठवले. मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ. शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल); ही शिमोनाची कूळे. लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नावे हेः गेर्षोन, कहाथ, व मरारी. गेर्षोनाचे पुत्रः त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हेः गेर्षोनाचे दोन पुत्र लिब्नी व शिमी. कहाथाचे पुत्रः अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षांचे होते. मरारीचे पुत्रः महली व मूशी. लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती. अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले, तिच्या पोटी त्यास अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला. इसहाराचे पुत्रः कोरह, नेफेग व जिख्री. उज्जियेलाचे पुत्र: मिशाएल, एलसाफान व सिथ्री. अहरोनाने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाली. कोरहाचे पुत्रः अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे. अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीयेलाच्या कन्येशी लग्न केले; तिच्या पोटी त्यास फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्राएलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय. इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे याच कुळातले. इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसराचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे. मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसराचा राजा फारो याला सांग.” परंतु मोशेने परमेश्वरासमोर उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.”