YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिं. 5:1-8

2 करिं. 5:1-8 IRVMAR

कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकाळचे घर स्वर्गात आहे. या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे. आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात राहत असताना प्रभूपासून दूर आहोत. कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही; आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.