तिची सासू नामी तिला म्हणाली, “तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहायला नको काय? तर हे पाहा, ज्याच्या मोलकरणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे. तर तू नाहणमाखण कर. चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस. तो कोठे निजतो हे पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजून जा; मग काय करायचे ते तोच तुला सांगेल.” ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.”
रूथ 3 वाचा
ऐका रूथ 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रूथ 3:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ