YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 2:1-7

रूथ 2:1-7 MARVBSI

नामीच्या नवर्‍याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रूथ नामीस म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन; ती म्हणाली, “मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणार्‍यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्‍यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.” मग बवाज कापणी करणार्‍यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” कापणी करणार्‍यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय. ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्‍यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’

रूथ 2 वाचा

ऐका रूथ 2