मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मीही मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्युखेरीज तुमचा-माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.” आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले.
रूथ 1 वाचा
ऐका रूथ 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रूथ 1:14-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ