YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:9-13

रोमकरांस पत्र 8:9-13 MARVBSI

परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही; कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात; परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल.