परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?
रोमकरांस पत्र 8 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 8:28-31
8 दिवस
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ