आता जर तू स्वतःला यहूदी म्हणवत आहेस, आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस; आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाडे, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे; तर मग दुसर्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय? “तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे.
रोमकरांस पत्र 2 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 2:17-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ