YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 15:4-9

रोमकरांस पत्र 15:4-9 MARVBSI

धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”