तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की, “हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या; आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात.” परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? “ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.” तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.] तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले. “आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.”
रोमकरांस पत्र 11 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 11:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ