तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, “हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?” ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.”
रोमकरांस पत्र 10 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 10:14-18
३ दिवस
“महान आदेश” बायबल योजनेमध्ये आपले स्वागत आहे, ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्यास बाहेर जाऊन त्याचे प्रेम सर्वांना सांगण्यासाठी दिलेल्या दैवी आदेशाचे अध्ययन. हा तीन दिवसांचा प्रवास देवाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पाचारण म्हणून महान आदेशाचा स्वीकार करण्याच्या गंभीर महत्त्वाचे विवेचन करेल.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ