आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो. ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील; ‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.3 ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा सर्व4 जनांबरोबर असो. आमेन.
प्रकटी 22 वाचा
ऐका प्रकटी 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 22:17-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ