दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.” “‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’ ‘मी’ अल्फा व ओमेगा म्हणजे ‘पहिला व शेवटला,’ आदी व अंत असा आहे. आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो. ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील; ‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.3 ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा सर्व4 जनांबरोबर असो. आमेन.
प्रकटी 22 वाचा
ऐका प्रकटी 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 22:11-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ