YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 20:4-7

प्रकटी 20:4-7 MARVBSI

नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसर्‍या मरणाची सत्ता नाही, तर ते ‘देवाचे’ व ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील. ती हजार वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल