एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.” सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’ आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले, “ह्या मोठ्या नगरी‘सारखी कोणती’ नगरी आहे?” ‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे, ‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’ मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी! तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’ ‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’ नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला ‘आणि’ तो समुद्रात ‘भिरकावून म्हटले, “‘अशीच’ ती ‘मोठी’ नगरी ‘बाबेल’ झपाट्याने टाकली जाईल ‘व ह्यापुढे कधीही सापडणार नाही;”’ वीणा वाजवणारे, ‘गवई’, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा ‘नाद’ तुझ्यात ‘ह्यापुढे ऐकूच येणार नाही;’ कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही; ‘आणि जात्याचा आवाज’ तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही; ‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे’ रक्त सापडले.”’
प्रकटी 18 वाचा
ऐका प्रकटी 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 18:17-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ