नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. जे ‘श्वापद’ मी पाहिले ते ‘चित्त्यासारखे’ होते, त्याचे पाय ‘अस्वलाच्या’ पायांसारखे होते व त्याचे तोंड ‘सिंहाच्या’ तोंडासारखे होते; त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले; तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला; तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या श्वापदामागून गेली. अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले; आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?”
प्रकटी 13 वाचा
ऐका प्रकटी 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 13:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ