YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 12:7-10

प्रकटी 12:7-10 MARVBSI

मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; ‘मीखाएल’ व त्याचे दूत अजगराबरोबर ‘युद्ध करण्यास’ निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.