YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 9:13-20

स्तोत्रसंहिता 9:13-20 MARVBSI

हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्‍या, माझा द्वेष करणार्‍यांपासून मला झालेली पीडा पाहा; मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन; तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सीयोनकन्येच्या द्वारांसमोर हर्ष करीन. राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत; त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1 देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस; राष्ट्रांचा न्यायनिवाडा, तुझ्यापुढे होऊ दे. हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल; आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. (सेला)